भटकंती... म्हणजे मनाच्या keyboard वरचं refresh नावाचं button. एकदा दाबलं कि पुढचे अनेक दिवस शरीर, मन नावाची system अगदी मुळापासून refresh होते. ह्या refreshing process मध्ये निसर्ग अगदी जवळून पाहावयास मिळतो. तो किती सुंदर आणि बोलका आहे ते प्रकर्षानं जाणवतं. विविध प्रकारची मंडळी जाणून घेण्याचा अनुभव मिळतो. निसर्ग आणि ह्या निसर्गाच्या वाटेवर, सानिध्यात राहणारी माणसे किती सुंदर आहेत हे कळतं.
असाच एक अप्रतिम अनुभव मी कमावला दिवेआगार नावाच्या सुंदर गावी जाऊन. दिवेआगार हे तसं बऱ्यापैकी नावाजलेलं कोकणातलं एक छोटसं गाव.
पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीस मला ह्या गावी जाण्याचा योग आला. पुण्याहून साधारण १६० किलोमीटर प्रवास. Swargate हुन "महाड" नावाची बस सकाळी ७ वाजेला मी आणि माझ्या group ने पकडली. हिरकणी मध्ये बसून हा प्रवास सुरु झाला. IT च्या hecitc life मध्ये पूर्णतः गुंतलेले आम्ही सगळे नेहमी प्रमाणे ह्या trip साठी खूप उत्सुक होतो. आम्ही सगळे पहिल्यांदा दिवेआगारला चाललो होतो, आमच्या पैकी एक तर चक्क पहिल्यांदा समुद्र पाहणार होता. ह्या trip साठी आम्ही homestay prefer केला. "श्रीबाग" नावाच्या एका घरी आम्ही booking केलं . मी पहिल्यांदा homestay experience घेणार म्हणून जरा विचार केला कि लोकं कशी असतील, service कशी असेल. शहरातील लोकांप्रमाणे business minded असतील का? चहा कसा असेल, मस्त आलं घालून केलेला असेल कि शहराच्या हॉटेल सारखा अर्धा चहा आम्हाला बनवायला लावणार , तुमच्या हिशोबाने साखर दूध टाका, आम्ही आपलं पाणी उकळून देणार फक्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण!!! कोकणात गेलं आणि मासे खाल्ले नाही? असा प्रश्न almost प्रत्येक जण मला विचारतो. मी मात्र chicken fan. तारकर्लीला एका ३ star हॉटेल मध्ये chicken च्या नावाखाली पाणी + पोलिओ ग्रस्त कोंबडीचं chicken आम्हाला दिलं होतं. So कोकण म्हणजे खूप सारे coconut trees, समुद्रकिनारा, उकडीचे मोदक आणि माझी बिचारीची उपासमार असा माझा समज.
असा सगळा विचार करता करता ३ तासांत "माणगाव" नावाचं गाव आलं . आम्ही उतरलो, आता इकडनं next stop "म्हासळी" नावाच्या गावाचा . इकडे buses म्हणजे लाल डब्बे, ज्या मध्ये बसण्याआधीच मला उलटी होते, आता दुसरा आणि एकमेव option म्हणजे जीप. आता आम्ही पुढचा प्रवास जीप ने सुरु केला. त्या जीप मध्ये बसलेली मंडळी अगदी उत्साहाने आम्ही केलेल्या प्रत्येक पांचट joke ला दाद देत होते. आम्ही मजा मस्ती करत दीड तासात "म्हासळी" गावी पोहोचलो. मग पुढचा पल्ला होता "बरली" गावाचा. मला टमटम चा मोह काही आवरेना आणि सगळ्यांना घेऊन टमटम चा प्रवास सुरु केला. पाऊस, भाताची शेती, थंड स्वच्छ हवा असा अर्धा पाऊण तास प्रवास करून आम्ही "बरली" ला पोहोचलो आणि पुढे अजून १५मिनिटांचा प्रवास करायचा होता "श्रीबाग" ला पोहोचायला. आम्ही "बरली" ला उतरल्यावर जोरदार पाऊस सुरु झाला, पण सिद्धेश दादा ("श्रीबाग" चे owner) आम्हाला त्यांची कार घेऊन pick कारायला आले. तिथे आमचं "अतिथि देवो भव" सुरु झालं. "श्रीबाग" ला पोहोचल्यावर आमच्या राहण्याच्या ठिकाणी नेण्याआधी दादांनी समोरच असलेल्या त्यांच्या घरी नेलं . तिथे आम्हाला अप्रतिम असं कोकम सरबत देऊन आमचा स्वागत केलं .
Rooms अगदी प्रशस्त, स्वछ आणि सुंदर होत्या. लागणारी प्रत्येक वस्तू त्या Rooms मध्ये होती. चोहो बाजूंनी हिरवळ, पावसाची संततधार , awesome feel होता. जेवण झाल्यावर आमच्यातील अतिउत्साही मित्र समुद्रकिनारी जाण्यासाठी लगबग करू लागला. मी मात्र त्या वातावरणात एक मस्त शांत झोप घेण्याचा विचार केला. बाकी सर्व दुपारी समुद्रकिनारी गेले, जो अगदी १० मिनिटं अंतरावर होता. मी एक कडक झोप काढली. वर्षनुवर्ष न झोपल्यासारखी साखरझोप लागली मला. संध्याकाळी उठल्यानंतर fresh होऊन आम्ही दादांच्या घरी गेलो, चहासाठी. काकूंनी, दादांच्या आई ने, अप्रतिम चहा बनवला. चहाला कोंकणी आपलेपणाची चव होती. आम्ही वऱ्हांड्यात बसून गरम गरम चहा पित होतो आणि मस्त रिमझिम पाऊस सुरु होता. सुंदर असा निसर्ग मी डोळे भरून पाहत होते. बराच वेळ आम्ही तिथे बसून गप्पा केल्या.
काकूंनी आम्हाला रात्री काय menu हवा विचारलं. आम्ही सर्वांनी chicken ला पसंती दिली. अतिशय tasty chicken बनवलं होतं काकूंनी. त्याच मिनिटाला कोकण आणि चिकन हे समीकरण तयार झालं.
Next day दुपारी जेवणात आम्ही अंडाकरी खाल्ली. लाजवाब, awesome. मी तर काकूंच्या पाककलेच्या प्रेमातच पडले.
त्या दिवशी दुपारी आम्ही सगळे समुद्रकिनारी जायला निघालो. पण मला जरा tension आलं, कारण पावसात भिजले कि मला लगेच खूप सर्दी होते. पण काकांनी, दादांच्या बाबांनी मला एक छत्री आणि त्यांचा रेनकोट दिला. निघण्याआधी मी काकांकडे नारळाच्या झाडांबद्दल कुतूहलाने माहिती विचारत होते. काकांनी आम्हाला सांगितलं कि ते काही सेकंदात चढतात झाडावर. मग ते आम्हाला एका सगळ्यात उंच झाडाकडे घेऊन गेले आणि खरंच काही सेकंदात झाडावर चढले. आणि आम्हाला unlimited fresh नारळ पाण्याचा आनंद मिळाला.
काका म्हणजे अतिशय उत्साही व्यक्ती. सकाळी चहाच्या वेळी ते आम्हाला त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगत होते, नंतर कब्बडी च्या खेळातले त्यांचे अनुभव आम्हाला सांगितले. त्यांच्या वऱ्हांड्यात दोन photos आहेत , जे actually paint केलेले आहेत. विजेत्या पदाची बक्षिसे स्वीकारतानाचे photos आहेत ते.
मनमुराद नारळपाणी पिऊन आम्ही सगळे समुद्रकिनारी जायला निघालो. धुवाधार पाऊस, खवळलेला समुद्र हे दृश्य मी पहिल्यांदाच अनुभवलं. दिवेआगारचा समुद्रकिनारा हा दूरदूरपर्यंत दाट हिरव्यागार झाडांनी नटलेला आहे. त्यावेळी मला बालपणीच्या आठवणींना revisit करावं वाटलं आणि मी किनाऱ्यावर असलेली ओली रेती सगळ्यांच्या अंगावर टाकायला सुरुवात केली, १-२ तास आम्ही मनसोक्त त्या चिखलात लोळलो आणि संध्याकाळी "श्रीबाग" ला परतलो . संध्यकाळी काकूंनी आम्हाला वाडी फिरून या म्हणून सांगितलं. काकू रात्री उकडीचे मोदक बनवायच्या तयारीला लागल्या.
असंख्य नारळाची, सुपारीची, केळीची , फणसाची झाडं, जिकडे तिकडे हिरवळ.
रात्री जेवणात काकूंनी अप्रतिम चिकन बनवलं होतं , व्वा व्वा व्वा, amazing, hatts off to काकू .
आता आम्ही next day परतण्याच्या तयारी ला लागलो. मन पूर्णपणे रमलं होतं त्या वातावरणात आणि त्या निरागस लोकांमध्ये. सकाळी नाश्ता होता तो famous कोकणी पदार्थ "घावन" आणि पोहे.
lifetime आठवणींमध्ये भर म्हणून खुपसारे photos click केले दादा, काका आणि काकुंसोबत, आणि दुपारी १२ वाजता घरासमोरच्या चौकातून बस पकडून परतलो....
Please do visit facebook page of "Shreebag homestay" for more info: https://www.facebook.com/Shreebag/?fref=ts




